आरोग्यासाठी गुणकारी सोयाबीन


सोयाबीन हे कर्बोदके, प्रथिने यांचे उत्तम स्रोत आहे. ज्या व्यक्तींना उच्चरक्तदाबाचा विकार असेल, त्यांनी आपल्या आहारामध्ये सोयाबीनचा समावेश करावा. त्यामुळे उच्चरक्तदाब नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होईल. सोयाबीनच्या सेवानाने शरीरामध्ये लोहाची कमतरता होत नाही. त्यामुळे अनिमिया सारख्या व्याधींना तोंड देण्यासाठी आहारामध्ये सोयाबीनचा समावेश करावा. सोयाबीन मध्ये असणारे आयसोप्लेबोंस नामक रसायन शरीराचा ऑस्टीयोपोरोसीस या व्याधीपासून बचाव करण्यास सहायक आहे.

लहान मुलांच्या योग्य शारीरिक विकासासाठी तसेच नखे, केस याची वाढ नीट होत नसल्यास आहारामध्ये सोयाबीनचा समावेश करावा. सोयाबीन प्रथिनांचे मुख्य स्रोत आहे. त्यामुळे शारीरिक विकासासाठी आणि नखे, केस याच्या उत्तम वाढीसाठी याचे सेवन अवश्य करायला हवे. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी, किंवा फिट्स येत असल्यासही सोयाबीनच्या सेवनाने गुण येऊ शकतो. यामध्ये असलेले मॅग्नेशियम शांत निद्रा येण्यास सहायक आहे.

सोयाबीन मध्ये असलेले लेसीथीन लिव्हरच्या आरोग्याकरिता अतिशय गुणकारी आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील सोयाबीन लाभकारी आहे. पदार्थ बनविण्यासाठी मधुमेहींनी सोयाबीनच्या तेलाचा वापर करावा. ज्या व्यक्तींचे वजन कमी असेल, त्यांनी अंकुरित सोयाबीनचे सेवन करावे. लहान मुले सतत गोळ्या, बिस्किटे, चॉकोलेट्सचे सेवन करीत असतात. या गोष्टींच्या अतिसेवनाने त्यांच्या पोटामध्ये जंत होण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून सोयाबीन पासून बनविलेले दही पाणी घालून पातळ करावे आणि हे ताक मुलांना प्यायला द्यावे. त्यामुळे पोटामधील जंतांचा नाश होईल.

सोयाबीन हा पदार्थ आपल्या आहारामध्ये निरनिरळ्या प्रकारांनी समाविष्ट करता येईल. अंकुरित सोयाबीन, सोया ग्रॅन्युल्स, सोया नगेट्स, हे सोयाबीनचे प्रकार आहारामध्ये समविष्ट करावेत. याशिवाय सोयाबीनपासून तयार केलेले दुध, दही हे देखील बाजारामध्ये उपलब्ध आहेत. यांचे सेवन देखील आरोग्यासाठी चांगले आहे.