या गावात नेत्यानाही प्रवेशबंदी


भारत हा खेड्यांचा देश आहे. प्रत्येक गावाचे स्वतःचे काही रीतीरिवाज आहेत, परंपरा आहेत मात्र असे असले तरी सर्व गावे सरकारच्या अधिपत्याखाली आहेत. झारखंड मधील ३४ गावे याला अपवाद आहेत. २०१७ साली त्यांनी देशाचे कायदे, नियम धुडकावून लावले असुन स्वतःचे कायदे केले आहेत. आणि त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही नेते अगदी पंत्र्प्रधान, राष्ट्रपती, सरकारी वरिष्ठ अधिकारी आणि बाहेरचे नागरिक यांना आत प्रवेश करण्यास मनाई केली आहे. तसे बोर्ड गावाच्या सीमेवर लावले गेले आहेत.

झारखंड मधील ३४ ग्रामसभानी असे स्वतःचे कायदे केले असून ही गावे राजधानी रांचीपासून जवळ आहेत. या गावांनी सीमेवर बॅरिकेड लावले आहेत त्याला पत्थलगडी म्हणजे दगडी कुंपण असे म्हणतात. या दगडांवर गावाची घटना लिहिली गेली आहे. ग्रामस्थ मचाणावर बसून गावाच्या सीमेवर लक्ष ठेवतात आणि परवानगीशिवाय कुणी आत येण्याचा प्रयत्न केला तर दंड करतात. गोड्डा, लोहरदगा, पलामु आणि पाकुद अश्या चार जिल्हातील ही गावे आहेत.

Leave a Comment