लठ्ठपणाचा शाप


लठ्ठपणा हा एक जुनाट आजारच झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जगातले १२० कोटी लोक वजनदार असल्याचे म्हटले आहे. या बाबत भारत देश आघाडीवर आहे. लठ्ठ माणसांची संख्या अमेरिकेत सर्वात अधिक असून तिच्या पाठोपाठ चीन आणि भारताचे क्रमांक लागतात. जगातले दहा देशांत लठ्ठपणाचा विकार मर्यादेपेक्षा गंभीर स्वरूपाचा झाला असल्याचे एक पाहणीत दिसून आले आहे. बैठी कामे, जंक फुड आणि अल्कोहोल ही लठ्ठपणाची मुख्य कारणे आहेत असे जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात म्हटले आहे. पती आणि पत्नी असे दोघेही लठ्ठ असले की मुले होण्यात अडचणी येतात. जगात अशा जोडप्यांची संख्या सहा ते सात कोटी असून त्यातली दीड कोटी जोडपी भारतातली आहेत.

लठ्ठपणाच्या मागे अनेक कारणे आहेत पण ती काहीही असली तरीही आपल्याला त्याच्याशी लढा द्यावा लागेल कारण लठ्ठपणातूनच मधुमेह आणि रक्तदाबाची शक्यता निर्माण होत असते. स्त्रीयांत तर मासिक पाळीची अनियमितता, वंध्यत्वाचा धोका, त्यावरील उपचार निष्प्रभ होणे, गर्भपाताची शक्यता शिवाय गरोदर अवस्थेत मधुमेह बळावण्याची शक्यता हे सारे प्रकार लठ्ठपणाचीच देणगी असतात. एका नामांकित वंध्यत्व निवारण केन्द्राच्या संचालिकेने म्हटले आहे की, तिच्याकडे मूल होत नसल्यामुळे दररोज सरासरी २५ रुग्ण येतात पण त्यातल्या १५ ते १६ जणांना केवळ लठ्ठपणामुळे मूल होत नसते. वयात येणार्‍या मुलींतही लठ्ठपणामुळे बीजांडात दोष निर्माण होण्याची शक्यता असते.

असा धोका दिसत असतानाही मुलींच्या आया काळजी घेत नाहीत त्यामुळे या वयातल्या मुलींत लठ्ठपणा एखाद्या साथीच्या रोगासारखा पसरत चालला आहे. त्यांनी खालील काळजी घेतली पाहिजे. दिवसांतून तीन वेळा थोडे थोडे जेवण केले पाहिजे आणि जेवणात भाज्या आणि फळांचा समावेश केला पाहिजे. दररोज नियमाने व्यायाम केला पाहिजे. पुरेसे पाणी प्राशन केले पाहिजे. रोज किमान सहा ते जास्तीत जास्त आठ तास शांत झोप घेतली पाहिजे. ज्या अन्न पदार्थात साखर आणि चरबीचा समावेश असेल असे पदार्थ टाळले पाहिजेत. धूम्रपान वर्ज्य केले पाहिजे. मद्यपान तर अजीबातच नको. दिवसांतून किमान दोन वेळा चालले पाहिजे आणि प्रत्येक वेळी किमान ३० मिनिटे चालले पाहिजे. लठ्ठ महिलांना मुले झाली तरीही ती लठ्ठ होण्याचीच शक्यता असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment