बंद होणार जिओची मनी मोबाईल वॉलेट सेवा


मुंबई : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना एक सेवा बंद करणार असण्याच्याबाबत अलर्ट केले आहे. जिओची जिओ मनी मोबाईल वॉलेट सेवा २७ फेब्रुवारीनंतर बंद करण्यात येणार आहे. जिओने याबाबतची माहिती आपल्या ग्राहकांना एसएमएसद्वारे दिली आहे. हा निर्णय आरबीआयच्या गाईडलाईननंतर घेण्यात आला आहे.

आरबीआयच्या गाईडलाईननुसार, मोबाईल वॉलेटद्वारे पैसे बँकेत ट्रान्सफर करण्याची सुविधा बंद केली जाणार असून २७ फेब्रुवारीपासून हा नियम लागू होणार आहे. दरम्यान ग्राहक २७ फेब्रुवारीआधी पैसे ट्रान्सफर करत असतील तर त्यांना कोणत्याही प्रकारचे चार्ज लागणार नाहीत.

Leave a Comment