१०० चौ.मीटरचा नवा देश किंग्डम ऑफ एन्क्लाव्हा


युरोप मधील काही मित्रांनी स्लोवानिया आणि क्रोएशिया याच्या सीमेवरचा कुणाच्याच मालकीचा नसलेला एक जमिनीचा तुकडा स्वतंत्र देश म्हणून घोषित केला असून त्याचे नामकरण किंग्डम ऑफ एन्क्लाव्हा असे केले आहे. हा देश अगदी चिमुकला म्हणजे अवघा १०० चौरस मीटर परिसराचा आहे. सध्या या देशाचे ८०० लोकांनी आभासी निवडणुका घेऊन मतदान झाले व मंत्री निवडले गेले असे समजते.

वरजेंकिविज नावाच्या तरुणाने त्याच्या मित्रांसह हा नवा देश स्थापन केला आहे. क्रोएशियाची राजधानी जागरेब जवळ हा जमिनीचा तुकडा आहे. १९९१ साली युगोस्लावियाचे विघटन झाले तेव्हा त्यातून ७ राज्ये बनली. त्यांच्यात आपसात सीमा वाद होताच. त्यातून नो मॅन्स लँडची घोषणा झाली. नव्या देशाची जागा यातीलच एक असल्याचे समजते. या देशाने जगातील सर्व नागरिकांसाठी त्यांचे दरवाजे खुले केले आहेत. येथे रंग, जात, धर्म, राष्ट्रीयत्व यात भेदभाव केला जाणार नाही. शिक्षण मोफत व आयकर नाही अशीही जाहिरात केली गेली आहे. या देशाने सध्या ५ भाषांना मान्यता दिली असून त्यात चीनी भाषेचा समावेश आहे. देशाची घटना लवकरच लिहिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment