भारतीयांची पहिली पसंती कॉफी नाही तर चहाला


पिकते तेथे विकत नाही ही म्हण भारतीय कॉफी साठी अगदी लागू पडताना दिसते आहे. जगात कॉफी निर्यातीत सात नंबरवर असलेल्या भारतात नागरिकांची पहिली पसंती कॉफी नसून चहा असल्याचे इंटरनॅशनल कॉफी ऑरगनायझेशन च्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. भारतात दक्षिण भारतीय कॉफी अधिक प्रमाणात पीत असले तर देशात कॉफीपेक्षा चहा पिणारे नागरिक अधिक प्रमाणात आहेत. भारतातून ७६७ दशलक्ष पौंड कॉफी दरवर्षी निर्यात होते. हे प्रमाण जागतिक निर्यातीच्या ४ टक्के आहे. मात्र देशात कॉफीचा खप चहाच्या तुलनेत खुप कमी आहे.

जगात सर्वाधिक कॉफी खपणारया देशात फिनलंड १ नंबरवर आहे. येथे दरवर्षी सरासरी प्रत्येक नागरीकामागे १२ किलो कॉफी खपते. या यादीत नॉर्वे, आईसलंड, डेन्मार्क अनुक्रमे दोन, तीन व चार नंबर वर आहेत. ब्राझील हा सर्वात मोठा निर्यातदार देश असून गेली १५० वर्षे ब्राझीलने हे स्थान टिकविले आहे. अर्थात कॉफीच्या देशांतर्गत खपात ब्राझील जगात १५ व्या नंबरवर आहे. येथून दरवर्षी ५.७ अब्ज पौंड कॉफी निर्यात होते. कॉफी खपात अमेरिका २६ नंबरवर तर ब्रिटन ४५ व्या स्थानावर आहे असेही हा अहवाल सांगतो.

Leave a Comment