भारतात गेमिंग बिझिनेस २०२१ पर्यंत १०० कोटींवर जाणार


जगभरात सर्वत्र गेमिंग उद्योगात वाढ नोंदविली जात असताना भारतातही हा व्यवसाय वेगाने विकसित होत असल्याचे दिसून आले आहे. एका अहवालानुसार २०२१ पर्यंत भारतात ऑनलाईन गेमिंग व्यवसाय १०० कोटींची पातळी गाठेल असा अंदाज वर्तवला गेला आहे. पर्सनल कॉम्प्यूटर बरोबरच स्मार्टफोनमुळे गेमिंगचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे.

मोबाईल व अन्य प्लॅटफॉर्म वर युजर पझल, अॅक्शन, अॅडव्हेन्चर गेमिंगला जादा पसंती देत असल्याचेही दिसून आले आहे. असफाल्ट हा कार रेसिंग गेम, क्रिमिनल ऑपरेटर हा टेररीस्ट शूट करता येणार गेम हे विशेष लोकप्रिय असून हे ऑनलाईनवर मित्रांसोबत खेळता येतात. कँडी क्रश हा गेम मोबाईल युजर मध्ये खूप लोकप्रिय आहे. फॉलआउट शेल्टर, बॉलपूल व लहानवयापसून खेळला जात असलेला ल्युडो हे गेम स्मार्टफोनवर पण उपलब्ध आहेत आणि त्यांना युजर कडून चांगली पसंती मिळते आहे.

Leave a Comment