पोर्शेची ९११ जीटी ३ आरएस ३ सुपरकार भारतात आली


जर्मन स्पोर्ट्सकार मेकर पोर्शेने त्यांची पॉवरफुल ९११ जीटी ३ आरएस भारतात लाँच केली असून तिची एक्सशोरूम किंमत २ कोटी ७४ लाख रुपये आहे. या कारचे बुकिंग सुरु झाले आहे. ० ते १०० किमीचा वेग ही कार ३.२ सेकंदात घेते. कारला ५२० पीएसची मोटार व कॅलीब्रेटेड ७ स्पीड पिकेडी गिअर बॉक्स दिला गेला आहे.

रेस ट्रॅकवर उत्तम कामगिरी बजावता यावी यासाठी या कारमध्ये एरोडायनामिक्स डिझाईन वापरले गेले आहे. इंटेरिअर कार्बन फायबरपासून बनविले गेले आहे. माजी फॉर्म्युला वन रेसर नारायण कार्तिकेय याने या कारची खरेदी केली असल्याचे समजते.
या कारला ४ लिटरचे, सहा सिलिंडर बॉक्सर इंजिन दिले गेले आहे. सेव्हन स्पीड ऑटोमेटिक तसेच सिक्स स्पीड मॅन्यूअल गिअरबॉक्स दिला गेला आहे. स्मोक्ड हेडलँप, फोर पॉइंट एलईडी डीआरएल अशी तिची अन्य फिचर आहेत.

Leave a Comment