अॅपल त्याच्या आयफोन एसईचे उत्पादन भारतात करत आहेच पण त्यापाठोपाठ आता आयफोन एसई २ चे उत्पादनही भारतातील प्रकल्पात केले जाणार असल्याचे वृत्त आहे. हा फोन जून मध्ये बाजारात दाखल होईल असे नाईन टू फाईव्हच्या अहवालात म्हटले गेले आहे.
अॅपलचा मेक इन इंडिया आयफोन एसई टू जूनमध्ये येणार
लिक झालेल्या माहितीनुसार या फोनला ४.२ इंची डिस्प्ले, ए १० प्रोसेसर, २ जीबी रॅम,१२ एमपी चा कॅमेरा दिला जाणार आहे. हा फोन ३२ जीबी व १२८ जीबी अश्या दोन व्हेरीएन्ट मध्ये येईल असेही सांगितले जात आहे. होम बटण फिंगरप्रिंट सेन्सरसह असेल. स्क्रीन एसई पेक्षा मोठा करण्यासठी बेजललेस असेल असेही समजते.