जगातील सर्वात मोठी ब्रेन ट्यूमर सर्जरी; काढला १.८ किलोग्रॅमचा ट्युमर


मुंबई : मुंबईतील ३१ वर्षीय कापड विक्रेत्याच्या डोक्यातून तब्बल १.८७३ किलोग्रॅमचा ट्युमर काढण्यात आला असून डॉक्टरांनी दावा केला आहे की ही जगातील सर्वात मोठी ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रिया असून यापूर्वी १.४ किलोग्रॅमचा ट्युमर काढण्यात आला होता. या रुग्णाची तब्बल ट्युमरमधून सुटका झाली आहे.

मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर चॅरिटेबल रुग्णालय आणि टोपीवाला नॅशनल मेडिकल महाविद्यालयाच्या न्युरोसर्जरी (मज्जातंतू शल्यचिकित्सा) विभागात संतलाल पाल हा रुग्ण डोकेदुखीवरील उपचारासाठी दाखल झाला होता. रुग्ण पेशाने कापड विक्रेता असून त्याला सातत्याने केवळ डोकेदुखीचा त्रास होत होता. त्याच्या सीटी आणि मेंदूच्या एमआर स्कॅनची तपासणी करण्यात आली तसेच ट्युमरचा रक्तपुरवठा अभ्यास करण्यासाठी विशिष्ट सीटी अ‍ॅन्जिओग्राफी करण्यात आली.

कवटीच्या हाडांद्वारे मिडलाइनच्या दोन्ही बाजूंवर ३०७३०७२० सेंटीमीटरची गाठ पसरली होती. डोक्यावर या गाठीमुळे जडपणा व दृष्टीदोषात वाढ होऊन अंधत्व आले होते. नायरमधील न्युरोसर्जरीचे प्रमुख डॉ. त्रिमूर्ती नाडकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अखेर ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया करण्यात आली. सात तास चाललेल्या शस्त्रक्रियेद्वारे गाठ काढण्यात आल्याचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment