जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात ४जी स्पीड कमीच


भारतात ४ जीचा वेग हा जगभरातील इतर देशांच्या तुलनेत कमालीचा स्लो असून विशेष म्हणजे पाकिस्तानपेक्षाही कमी हा वेग असल्याचे ‘ओपनसिग्नल’ या मोबाइल अॅनालिटिक्स कंपनीने आपल्या सर्वेक्षणात म्हटले आहे.

ओपनसिग्नल या मोबाइल अॅनालिटिक्स कंपनीने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार भारतात ४जीचा वेग हा सर्वाधिक कमी असून पाकिस्तान, अल्जेरिया, कझाकस्तान आणि ट्युनिशिया या देशांपेक्षाही हा वेग कमी आहे. ६ खंडातील जवळपास ८८ देशांतील ४जी डाऊनलोड स्पीडची चाचणी केली यात भारत देश खूपच मागे असल्याचे समोर आले आहे.

भारताने २ जी सेवांवरून ४जी सेवांपर्यंत आपले जाळे विस्तारले आहे ही बाब चांगली असली तरी देशात या सेवेचा वेग जगाच्या तुलनेत मात्र कमीच आहे. भारतात ४जीचा वेग सरासरी ६ एमबीपीएस एवढा आहे. तो अनेकदा यापेक्षाही कमी असतो. पण हा वेग पाकिस्तानमध्ये भारतापेक्षा दुप्पटीहून अधिक म्हणजे १४ एमबीपीएस एवढा आहे. अल्जेरियामध्येही हा वेग ९ एमबीपीएस असल्याचे ‘ओपनसिग्नल’ने म्हटले आहे.

Leave a Comment