भारतवंशीय शिवा अय्यादुराई आहे ईमेलचा जनक


आज जगात सर्वत्र ईमेलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. या सेवेमुळे वेळेची बचत होते आहेच पण अक्षरशः कोट्यावधी टन कागदाची बचत होते आहे. या ईमेल चा शोध लावणारा व्ही ए शिवा आय्यादुराई मुळचा भारतीय पण आता अमेरिकेचा नागरिक आहे याची माहिती अनेकांना नाही. शिवाचा जन्म १९६४ मध्ये मुंबईत एका तमिळ कुटुंबात झाला असून तो वयाच्या सातव्या वर्षी आईवडिलांसोबत अमेरिकेला गेला व तेथेच स्थायिक झाला आहे.

१९७८ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी त्याने माध्यमिक शिक्षण सुरु असतानाच संगणक प्रशिक्षण घेण्यासाठी न्यूयार्क विद्यापीठात कोरांट इंस्टीट्युट ऑफ मॅथेटीकल सायन्ससाठी प्रवेश घेतला आणि त्यानंतर न्यूजर्सीच्या लीविंग्टन हायस्कूल व युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन अँड डेटीस्ट्री येथे रिसर्च फेलो म्हणून शिक्षण घेतले. येथेच त्याने पहिले इंटरऑफिस मेल सिस्टीम तयार केले व त्याला ईमेल असे नाव दिले.

या मेलमध्ये इनबॉक्स, आउटबॉक्स, फोल्डर, अॅड्रेसबुक, मेमो अश्या सर्व अॅटॅचमेंट होत्या. याच प्रोग्रॅमला ऑफिशियल ईमेल शोध मान्यता मिळाली. या शोधासाठी पहिला अमेरिकन कॉपी राईट दिला गेला कारण त्यावेळी सॉफ्टवेअर सुरक्षेसाठी कॉपीराईट हीच पद्धत उपलब्ध होती असे समजते.

Leave a Comment