थायलंड मध्ये कोंबड्यांच्या झुंजीवर कोट्यावधीचे बक्षीस


अनेक देशात बैल, कोंबडे याच्या झुंजी खेळविल्या जातात मात्र थायलंड मध्ये कोंबड्यांच्या ज्या झुंजी होतात त्याला जगात कुठेच तोड नसावी. या झुंजीही अन्यत्र होणाऱ्या कोंबड्यांच्या झुंजीप्रमाणेच असतात मात्र यात करोडो रुपयांची बक्षिसे दिली जातात. जेवढी गर्दी जास्त तितके बक्षीस जास्त असा येथला हिशोब असतो. या प्रकारे येथे नुकत्याच पार पडलेल्या झुंजीत विजेत्याला तब्बल साडे सहा कोटी रुपयांचे बक्षीस दिले गेले.


थायलंड मध्ये या झुंजी खूपच लोकप्रिय आहेत कारण या झुंजी त्याच्या संस्कृती परंपरेचा भाग आहेत. ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी खास प्रयत्न केले जातात. येथे कोंबड्यांच्या झुंजीसाठी क्रिकेटप्रमाणे मैदाने आहेत आणि झुन्जीच्या वेळी ती गच्च भरलेली असतात.

या झुंजीत सुदैवाने कोंबडा मरेपर्यंत वाट पहिली जात नाही. कोंबडा जखमी होईपर्यंत ही झुंज होते आणि जो कोंबडा प्रतिस्पर्धी कोंबड्याला जखमी करेल त्याला विजयी घोषित केले जाते. बक्षिसाची रक्कम मात्र विजेत्या कोंबड्याच्या मालकाला दिली जाते. झुंज पाहायला येणारे लोक कोंबड्यांवर पैसे लावतात. त्यातून बक्षीस दिले जाते.

Leave a Comment