पीएनबी आणि कर्जदार लाल बहादूर शास्त्री


सध्या हिरे व्यापारी नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार कोटींहून अधिक रकमेचा घातलेला गंडा जगभर चर्चिला जात आहे. मात्र याच बँकेचे एक कर्जदार माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा किस्सा प्रामाणिक कर्जदाराचे अनोखे उदाहरण ठरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लाल बहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान झाले तेव्ह्या त्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे घरही नव्हते आणि कारही नव्हती. पंतप्रधान झाल्यावर घरातील मुलांनी आपल्यला कार घ्या असा हट्ट धरला. शास्त्रीजींचे खाते पंजाब बँकेत होते. त्यांनी आपल्या खात्यात किती रक्कम आहे याची चौकशी केली. खात्यात होते ७ हजार रुपये. कारची किंमत होती १२ हजार. मुलांनी पैसे नाहीत तर कार नको असे म्हटले तरी शास्त्रींनी मुलांचा हट्ट पुरविण्यासाठी बँकेकडे ५ हजाराचे कर्ज मिळावे म्हणून अर्ज केला. कर्ज मिळाले कार आली पण दुर्दैवाने कर्ज फिटण्यापूर्वीच शास्त्रीजींचे निधन झाले.

शास्त्रीजींच्या नंतर पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यांनी सरकारतर्फे शाश्त्रीजींचे कार कर्ज माफ करण्याची बँकेकडे सूचना केली मात्र शास्त्रीजींच्या पत्नी ललिता यांनी त्यास नकार देऊन त्यांना मिळणाऱ्या पेन्शन मधून चार वर्षे कर्जफेड केली. आता ही कार लाल बहादूर शास्त्री मेमोरिअल मध्ये ठेवलेली असून ती पाहण्यासाठी लोक आवर्जून येतात.

Leave a Comment