एअरसेल चा दिवाळखोरीसाठी अर्ज


एअरसेलने कंपनी दिवाळखोर झाली असल्याचा अर्ज नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे सादर केला असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. हा अर्ज दाखल करण्यापूर्वीच कंपनीने संचालक मंडळ बरखास्त केले आहे. कमानीच्या सर्व सेवा लवकरच बंद होणार असून या दिवाळखोरीचा थेट परिणाम ५ हजार कर्मचारी, व्हेंडर, टॉवर ऑपरेटर, भारती इन्फ्राटेल, जेटीएल इन्फ्रा यांच्यावर होणार आहे.

एअरसेल बंद झाल्यानंतर एअरटेल, जिओ, व्होडाफोन आणि आयडिया या चार खासगी कंपन्या आणि सरकारी बीएसएनएल व एमटीएनएल कंपन्या व्यवसायात राहतील. त्यातही आयडिया व व्होडाफोनचे विलीनीकरण झाल्यानंतर तीनच खासगी कंपन्या या क्षेत्रात राहणार आहेत.

एअरसेल मधील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनीकडे व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी रोकड नाही. गेल्या सप्टेंबर पासून बँकेचे कर्ज हप्ते थकलेले आहेत. त्यात रिझर्व्ह बँकेने सर्व डेट रीस्ट्रक्चरिंग स्कीम योजना बंद केल्याने आमचे कर्ज रीस्ट्रक्चर होऊ शकलेले नाही, यामुळे दिवाळखोरीचा अर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment