इंटरनेट वापरात भारताची भरारी


इंटरनेट अँड मोबाईल असोसिअशन ऑफ इंडिया य केंटार आयएमआरबी यांनी नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार येत्या जून २०१८ पर्यंत भारतात इंटरनेट युजरची संख्या ५० कोटींचा आकडा पार करणार आहे. भारतात दरवर्षी इंटरनेट युजरची संख्या ११.३४ टक्क्यांनी वाढती आहे. डिसेंबर २०१७ अखेरी ही संख्या ४८.१ कोटींवर होती असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

इंटरनेट अँड मोबाईल असोसिअशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुबो रॉय म्हणाले शहरी भागात २०१६-१७ या काळात इंटरनेट युजरची संख्या २९.५ कोटींवर होती तर ग्रामीण भागात हीच संख्या १४.११ टक्क्यांनी वाढून १८.६ कोटींवर होती. शहरी भागात इंटरनेट चे ६२ टक्के म्हणजे २८.१ कोटी दैनिक युजर आहेत. ग्रामीण भागातील दैनिक म्हणजे दररोज इंटरनेट वापरणाऱ्यांचे प्रमाण ५३ टक्के आहे.

Leave a Comment