काँग्रेसशासित मेघालयामधील स्वैराचार राष्ट्रवादीच्या नेत्याच्या खुनामुळे उघड – राजनाथ सिंह


विलियमनगर – मेघालयमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या खुनावरून मेघालय सरकारवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तोफ डागली. काँग्रेसशासित मेघालयामधील स्वैराचार राष्ट्रवादीच्या नेत्याच्या खुनामुळे उघडकीस आल्याचे ईस्ट गारो हिल्स येथील एका मेळाव्याला संबोधित करताना सिंह म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी पुढे म्हटले कि, विलियमनगरच्या जागेसाठी निवडणूक लढणारे जोनाथन एन संगमा यांच्या हत्येविषयी शोक असून हा हल्ला पूर्वनियोजित असावा. जोनाथन संगमा यांच्यासह यावेळी समीन हसन नामक पोलीस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाल्याचे ईस्ट गारो हिल्सचे उपायुक्त रामकुमार सिंह यांनी सांगितले.

या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही नक्षलवादी संघटनेने किंवा इतरांनी घेतली नाही. कुकर्मींच्या शोधासह संगमांना पाठिंबा देणाऱ्यांना धमकीचे पोस्टर पाठवणाऱ्यांचाही शोध सुरू असल्याचे उपायुक्तांनी सांगितले. ईस्ट गारो हिल्स येथील सामंदा ब्लॉकमधील सविल्ग्रे गावातील मतदारांना नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुमानण्याचे आवाहन करण्यासाठी संगमा गेले होते. तिथून परतताना संगमा यांच्या गाडीत आयईडी स्फोट घडविण्यात आला होता.

Leave a Comment