मुंबई : ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन आयडिया सेल्युलरने बाजारात आणला असून १०९ रुपये ऐवढी या नव्या प्लॅनची किंमत असून यामध्ये अनलिमिटेड कॉल आणि १ जीबी ४जी/३जी डेटा देण्यात येणार असून, प्लॅन व्हिलिडिटी १४ दिवसांची आहे.
आयडियाचा १०९ रुपयांचा नवीन प्लॅन
आयडियाने मर्यादित सर्कलमध्येच नवीन प्लॅन उतरवल्याने, सगळ्यांनाच याचा फायदा घेता येणार नाही. त्यामुळे अर्थात, ज्या सर्कलमध्ये हा प्लॅन नसेल, तेथील आयडिया ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण असणार आहे. अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल आणि त्याचसोबत १ जीबी ३जी/४जी डेटा १०९ रुपयात मिळणार आहे. तसेच, लोकल आणि नॅशनल १०० एसएमएससुद्धा मिळणार आहेत. पण आयडियाने अनलिमिटेड कॉलसाठी एक अट ठेवली आहे. रोज २५० मिनिट आणि आठवड्याभरात एक हजार मिनिट कॉलिंग मोफत असेल.