मुकेश अंबानी डिजिटल एरियासाठी करणार ६० हजार कोटींची गुंतवणूक


रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी त्याची कंपनी देशातील पहिल्या इंटीग्रेटेड डिजिटल एरिया बनविण्यासाठी ६० हजार कोटीची गुंतवणूक येत्या १० वर्षात करणार असल्याचे जाहीर केले आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र इन्व्हेस्टर परिषदेत ते बोलत होते.

अंबानी म्हणाले महाराष्ट्रासाठी ही योजना महत्वाची आहे आणि मोठी आहे.आमच्या या योजनेत गुंतवणुकीसाठी विदेशी टेक कंपन्याही उत्सुक आहेत. किमान २० कंपन्यांनी गुंतवणुकीची तयारी दाखविली आहे. त्यात सिमेन्स, एचपी, डेल, सिस्को, नोकिया यांचा समावेश आहे. भारतातील ही चौथी औद्योगिक क्रांती ठरेल असेही ते म्हणाले.

अंबानी म्हणाले चीनने त्याची उत्पादक क्षमता वाढवून बरेच काही हासील केले आहे. आता भारताची वेळ आहे. ही योजना डिजिटल इंडिया आणि नवीन महाराष्ट्र ही स्वप्ने साकार करेल. भारताकडे नेतृत्वाची क्षमता आहे आणि कोणत्याच क्षेत्रात भारत मागे राहणार नाही असेही ते म्हणाले.

Leave a Comment