अंतराळातील बर्मुडा ट्रँगल बदल थोडेसे


आपल्यातील बरेच जणांना अटलांटिक महासागरातील एका भागात जहाजे, विमाने अचानक बेपत्ता होतात व त्यांचा शोध कधीच लागत नाही हे ऐकून माहिती आहे. हा रहस्यमयी भाग बर्मुडा ट्रँगल या नावाने कुप्रसिद्ध आहे. मात्र अंतराळातही असाच एक बर्मुडा ट्रँगल आहे याची माहिती फारशी कोणाला नाही. या भागातून जाणारया अंतराळ यान अथवा प्रयोगशाळा, उपग्रह यानाही असाच गूढ अनभव येतो. मात्र या बर्मुडा ट्रँगल मागचे रहस्य व कारण संशोधकांना माहिती आहे.

नासाचे अंतराळवीर टेरी वार्तस यांनी त्याच्या पहिल्याच अंतराळ मोहिमेत आलेला अनुभव सांगितला आहे. ते म्हणतात ते झोपण्यासाठी तयार होत असताना अचानक अतिशय तेजस्वी पांढऱ्या किरणांनी त्याचे डोळे दिपले. मात्र अश्या प्रकाशाबद्दल यांना कल्पना होती. अटलांटिक महासागर आणि ब्रीझील याच्या वरच्या अवकाशात हा अनुभव येतो.

येथून जाताना अचानक अतिशय तीव्र प्रकाश दिसतो आणि संगणक व बाकी उपकरणे काम करेनाशी होतात. हे सारे सुर्वापासून निघणारया प्रकाशकिरणांनातून होणाऱ्या रेडीएशनमुळे होते. सूर्यापासून निघणार्या अतितीव्र किरणापासून पृथ्वीचे संरक्षण एलेन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणारया पट्ट्यामुळे होते. मात्र पृथ्वी गोल नसल्याने हा पट्टा सर्वत्र सारखा जाड नाही. पृथ्वीच्या धृवाजवळ तो पातळ आहे त्यामुळे या भागात सूर्यकिरणामुळे होणारे रेडीएशन जास्त प्रमाणात जाणवते.

उपग्रह, अंतराळ याने हे रेडीएशन सहन करू शकत नाहीत य त्यामुळे त्याच्यावरची यंत्रणा बंद पडते. नासाची दुर्बीणही या भागातून जाताना काम बंद करते. पर्यटकांसाठी मोठे आकर्षण असलेले नेदरलँड्समधील चमकदार हिरव्या, निळ्या रंगाचे नॉर्दन लाईट याच कारणामुळे दिसतात असेही समजते.

Leave a Comment