शाओमी बनतेय भारतीय कंपनी


चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी शाओमी पूर्णपाने भारतीय बनण्याच्या प्रयत्नात असून त्याच्या नव्याने लाँच झालेल्या रेडमी नोट ५ आणि नोट प्रो चे १०० टक्के उत्पादन भारतात करण्यात येणार असल्याची घोषणा केली गेली आहे. आंध्रातील श्रीसिटी मध्ये कंपनीच्या सुरु असलेल्या दोन युनिट मध्ये हे उत्पादन केले जाणार आहे असे कमानीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक व ग्लोबल उपाध्यक्ष मनोजकुमार यांनी सांगितले.

ते म्हणाले मेक इन इंडिया अंतर्गत चीनी कंपन्याची योगदान वाढते असून या दोन देशात व्यावसायिक नातेही चांगले आहे. भारतात विकल्या जाणारया कंपनीच्या स्मार्टफोन पैकी सध्या ९५ टक्के उत्पादन भारतातील युनिटमध्येच केले जात आहे ते आता १०० टक्क्यावर नेले जाणार आहे. नोईडा येथेही कंपनी त्याचे नवे तिसरे उत्पादन युनिट सुरु करत आहे. कंपनीने भारतात ऑनलाईन मार्केट मध्ये ५७ टक्के वाट मिळविला आहे मात्र ऑफलाईन मध्ये हा वाटा ११ टक्के आहे. तो वाढविण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment