या गोष्टींचे महिलांना वाटते भय…


प्रत्येकाच्या मनामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती असते. ही भीती एखाद्या वस्तूची, प्राण्याची, एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या परिस्थितीची देखील असू शकते. विशेषतः महिलांच्या मनामध्ये काही गोष्टींबद्दल सतत भीती असते. काही महिलांच्या मनामध्ये, आपल्या आसपासच्या लोकांना आवडू किंवा नाही ही भीती खूप खोलवर रुजलेली असते. त्यामुळे नेहमी आकर्षक दिसण्यासाठी आणि आपल्या आसपासच्या लोकांवर आपली चांगली छाप पडावी या करिता महिला विशेष प्रयत्नशील असतात.

तसेच काही महिलांच्या मनावर आपले इतरांशी असलेले नातेसंबंध तुटतील अशी भीती सतत असते. त्यांच्या या भीतीचे त्यांच्या मनावर इतके दडपण असते, की त्यापायी प्रत्येक नातेसंबंधामध्ये या महिला स्वतःचे स्थान निर्माण करू शकत नाहीत. इतरांना काय वाटेल, किंवा आपल्या वागण्या-बोलण्याने इतरांची मने दुखविली जाऊन त्यांच्याशी असलेले आपले नातेसंबंध बिघडतील अशी भीती या महिलांच्या मनामध्ये असते. त्या पायी आपली मते व्यक्त करण्यास किंवा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यास या महिला पुढे येत नाहीत.

बहुतेक सर्वच महिलांच्या मनामध्ये शारीरिक हानी बद्दल भीती असते. आणि केवळ महिलांच्याच मनामध्ये नाही, तर ही भीती कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आपल्या आसपास सतत घडत असलेल्या हिंसक प्रकारांमुळे ही भीती प्रत्येकाच्याच मनामध्ये असते. महिलांच्या मनामध्ये, आपल्याबद्दल लोकांना काय वाटत असेल, या बद्दल देखील काही प्रमाणामध्ये भीती असते. या भीतीमुळे त्यांच्या क्षमतेवर, आत्मविश्वासावर विपरीत परिणाम होत असतात. अश्या प्रकारची मनावरील दडपणे घालविण्यासाठी आत्मविश्वासाची गरज आहे.

Leave a Comment