विकलांग व्यक्तींसाठी पहिले वहिले ‘ मॅच मेकिंग ‘ अॅप


मुंबईमधील ‘फायनान्स’ सारख्या विषयामध्ये पदवी घेतलेली कल्याणी नामक तरुणीने विकलांग व्यक्तींच्या सहाय्यासाठी एक नूतन कल्पना अंमलात आणली आहे. ह्या तरुणीने खास विकलांग व्यक्तींसाठी एक सामाजिक व्यासपीठ तयार करीत त्यांच्यासाठी आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या तरुणीने विकलांग व्यक्तींसाठी “ इंकलव्ह “ या मॅट्रीमोनियलचे , म्हणजेच वधूवर सूचक मंडळाचे निर्माण केले आहे. विकलांग व्यक्तींच्या मदतीसाठी काही तरी करण्याच्या इच्छेतून तिला ही कल्पना सुचली असल्याचे ती म्हणते.

आपल्या देशामध्ये विकलांग व्यक्तींची संख्या आठ कोटींच्या आसपास आहे. त्यातील केवळ पाच ते आठ टक्के व्यक्ती विवाहित आहेत. विकलांग व्यक्तींचे समाजामध्ये चांगले स्थान असले, नोकरीमध्ये जरी ह्या व्यक्ती उच्चपदस्थ अधिकारी असल्या तरी आपल्या शारीरिक व्यंगामुळे एखाद्या मॅट्रीमोनियल वेबसाईट वर लग्नासाठी नाव नोंदणी करताना या व्यक्तींच्या मनामध्ये संकोच असल्याची शक्यता असते. शरीराने संपूर्णपणेपणे स्वस्थ असणाऱ्या व्यक्तींसाठी देखील आयुष्याचा जोडीदार निवडणे कठीण काम असते. त्यामुळे विकलांग व्यक्तींना तर या बाबतीत जास्तच अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने ही वधुवरसूचक वेबसाईट आपण तयार केली असल्याचे कल्याणी म्हणते.

विकलांग व्यक्तींसाठी असलेली “ इंक लव्ह “ ही भारतातील पहिलीच वधूवर-सूचक एजन्सी असून, ह्याच्या अॅप द्वारे अनेक विकलांग व्यक्तीना आपल्या आयुष्याचे जोडीदार निवडण्याची संधी मिळत आहे. ह्या एजन्सीचे कार्यकर्ते विवाहेच्छुक विकलांग आणि त्यांच्या परिवारजनांची भेट घेतात. योग्य ती माहिती मिळवून त्यांची पडताळणी केल्यानंतर मगच विवाहेच्छुक विकलांग व्यक्तीसाठी योग्य जोडीदाराचे पर्याय सुचविले जातात. तसेच विवाहेच्छुक विकलांग व्यक्तींना एकमेकांना भेटता यावे या करिता सोशल स्पेसेसचे आयोजन देखील ही एजन्सी करीत असते.

Leave a Comment