सीबीआयने पंजाब नॅशनल बँकच्या ब्रॅडी हाऊस शाखेला ठोकले सील


मुंबई – मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेची ब्रॅडी शाखा सीबीआयकडून बँक गैरव्यवहार प्रकरणी सील करण्यात आली असून ही शाखा सीबीआय तपासासाठी न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे. हजारो करोडोचा पंजाब नॅशनल बँकमध्ये झालेला घोटाळा उघड झाल्यानंतर सीबीआयने झपाट्याने पाऊले उचलत कारवाईला सुरुवात केली. या घोटाळ्यातील प्रमुख सुत्रधार नीरव मोदीच्या मालमत्तेवरही सीबीआयने देशभरात छापे मारले होते.

याच शाखेत बसून सध्या अटकेत असणाऱ्या गोकूळनाथ शेट्टी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नीरव मोदीवर पैशांचा पाऊस पाडल्याचे समोर आले आहे. सध्या गोकूळनाथ शेट्टी आणि त्याचे सहकारी पोलीस कोठीडत आहेत. दरम्यान, नीरव मोदी पाठोपाठ रोटोमॅक कंपनीचा मालक विक्रम कोठारी देखील सरकारी बँकांचा आठशे कोटी रुपये थकवून देशाबाहेर पसार झाला आहे. कानपूरची कंपनी रोटोमॅक इंडियाच्या नावे कोठारीनी अनेक सरकारी बँकांनी अहलाहबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँकेकडून एकूण ८०० कोटी रुपयांची कर्ज घेतली आहेत. कोठारींवर विलफुल डिफॉल्टर म्हणून घोषित केले होते.

Leave a Comment