मुलांची ओळख रोबोट्रोनिक्सशी करून देऊ या


चौदा वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांसाठी सेफ्टी एज्युकेशन प्रोडक्ट्स बनविण्यामध्ये रोबोट्रोनिक्स अग्रेसर आहे. यामध्ये सहा हजारांपेक्षा जास्त पद्धतींची ‘इंटरॅक्टीव्ह रोबोटिक कॅरेक्टर्स’ मुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच या कॅरेक्टर्सचे कॉस्च्युम्स, पपेट प्रोग्राम्स, आणि शैक्षणिक साहित्य देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. या द्वारे मुलांमध्ये त्यांच्या सुरक्षिततेविषयी आणि शारीरिक इजा होण्यापासून बचाव करण्याविषयी जागरूकता निर्माण करणे सोपे झाले आहे.

आजच्या यंत्रयुगामध्ये रोबोट्स नी मोठमोठ्या कारखान्यांपासून अगदी आपल्या घरांतील स्वयंपाकघरामध्ये देखील प्रवेश केला आहे. आता अशी कित्येक कामे आहेत, जी मानवाऐवजी रोबोट्स द्वारे केली जात आहेत. भविष्यकाळामध्ये मानवी परिश्रमांची गरज संपुष्टात येऊन रोबोट्सची आवश्यकता वाढणार असल्याची चिन्हे आतापासूनच दिसत आहेत. त्यामुळे मुलांना देखील यांच्याबद्दल शिकण्याची संधी मिळणे अगत्याचे झाले आहे.

मुलांना एखादे सॉफ्टवेअर असेम्बल करावयास शिकविणे आणि त्यातून त्या सॉफ्टवेअरची कार्यपद्धती समजून घेतल्याने मुलांचे ज्ञानवर्धन होणे, शास्त्र आणि गणित या विषयांचे आकलन होण्यास मदत होणे, ही कामे आता शिक्षण क्षेत्रामधील रोबोट्सच्या सहभागामुळे सहज शक्य होत आहेत. त्याशिवाय मुलांचा अभ्यासातील रस, रोबोट्स च्या सहभागामुळे वाढताना पहावयास मिळत आहे.

मुलांच्या शिक्षणामध्ये सहाय्यक अश्या काही रोबोटिक किट्स आणि खेळण्यांचा विचार करता येईल. हेक्सबग, लेगो माइंडस्टॉर्म, ओ डब्ल्यू आय ग्रासहॉपर कीट, अशी निरनिराळी रोबोटिक खेळणी आणि किता बाजारामध्ये उपलब्ध आहेत.