जिओमुळे उठला एअरसेलचा बाजार


मुंबई: आता आणखी एका दूरसंचार कंपनीवर रिलायन्स जिओमुळे ‘टाळे’ लावण्याची वेळ आली असून नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे दूरसंचार कंपनी एअरसेलने दिवाळखोर जाहीर करावे यासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपन्यांच्या पाच हजार कर्मचाऱ्यांवर परिणामी बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. दूरसंचार क्षेत्रात ‘जिओ’ने प्रवेश केल्यांनतर इतर दूरसंचार कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. जिओच्या दूरसंचार क्षेत्रातील प्रवेशानंतर बंद पडलेली ही चौथी टेलिकॉम कंपनी आहे.

सध्या सुमारे १५हजार कोटींचे कर्ज ‘एअरसेल’वर असून याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आता कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे दिवाळखोर घोषित करावे यासाठी कंपनीचे संचालक मंडळ याचिका दाखल करणार आहे. पण यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया कंपनीकडून देण्यात आलेली नाही.

Leave a Comment