तापी घाटावर बनले देशातील पहिले सूर्य परिवार मंदिर


मध्यप्रदेशातील बैतुल जवळ खेडी येथे तापी नदीच्या घाटावर देशातील पहिले सूर्य परिवार मंदिर बनले असून या मंदिरात सूर्य परिवारातील मूर्तींच्या प्रतिस्थापना करण्याची सुरवात झाली आहे. १८ फेब्रुवारी पासून हा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु झाला आहे. सूर्यपुत्र शनिदेव याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना १७ फेब्रुवारीला करण्यात आली आहे.

या मंदिरात यमराज, यमुना, सूर्य देवाच्या पत्नी संध्या आणि छाया, मुलगी तपतीदेवी, आदित्यनंदन भगवान सूर्य याच्या प्रतिमा स्थापन होत आहेत. १९ फेब्रुवारी रोजी भंडारा आणि पूर्णाहुती कार्यक्रम केला जात आहे.

Leave a Comment