जगातील सर्वात भक्कम तिजोरीत आहे ४६०० मे. टन सोन्याचा साठा


जगातील एक नंबरची महासत्ता असलेल्या अमेरिकेकडे सरकारी मालकीचा सोन्याचा प्रचंड मोठा साठा असे आणि या सोन्यातील मोठा हिस्सा जगातील सर्वात सुरक्षित असा दावा केल्या जाणारया तिजोरीत आहे. केंटुकी येथील फोर्ट नॉक्समध्ये असलेल्या बुलियन डीपॉझीटरी मध्ये हा साठा आहे. ही जागा लष्कराच्या मालकीची असून ती ट्रेझरी विभागाला दिली गेली आहे. ही तिजोरी अभेद्य असल्याचा दावा केला जातो.

ही जागा १०९,००० एकर परिसरात पसरलेली आहे. गोल्ड व्होल्टला ग्रॅनाइट भिंतीचे कुंपण आहे आणि इमारतीचे छत बॉम्बप्रुफ आहे. येथे मल्टीपल अलार्म फेन्सिंग असून हेलिकॉप्टर ची गस्त सतत सुरु असते. व्हॉल्टचे दरवाजे २२ टन वजनाचे आहेत. स्टाफमधल्या १० वेगवेगळ्या लोकांच्या कॉम्बीनेशन कोडमधून याचा पासवर्ड तयार केला गेला आहे.

या इमारतीच्या जवळ जाण्यासाठी हेलिकॉप्टर, टँक्स, कुंपण, गार्ड, भक्कम भिंती यांना ओलांडावे लागते. चारी बाजूने अलार्म वाजतात ते वेगळेच. १९३६ साली या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले गेले होते. त्यावेळी बांधकामासाठी ३ कोटी रुपये खर्च आला होता. १९८८ साली या इमारतीची अमेरिकेतील ऐतिहासिक स्थळांच्या यादीत निवड केली गेली आहे.

Leave a Comment