चंद्रावर महिला अंतराळवीराची पावले पडण्याची शक्यता


अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने पुढील चांद्रमोहिमेत अंतराळवीरांमध्ये महिला अंतराळवीर असण्याची व महिलेची पावले चंद्रावर पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरचे संचालक डॉ. एलेन ओचोमा यांनी दिलेल्या माहितीनुसार नासा मध्ये सध्या असलेल्या प्रत्येकी तीन अॅक्टीव्ह अंतराळवीरांमध्ये एक महिला अंतराळवीर असे प्रमाण आहे. त्यामुळे यंदाच्या शतकात चंद्रावर पडणारे पुढचे मानवी पाउल महिलेचे असू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार १९६० सालीही महिलांनी नासाकडे चंद्र मोहिमेत चंद्रावर जाण्यासाठी अर्ज केले होते मात्र चंद्रावर महिलांना पाठविण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगून हे अर्ज फेटाळले गेले होते. असे अर्ज करणारयात अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री व माजी फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन याचाही समावेश होता. १९८३ साली सॅली राईड अंतराळात जाणारी पहिली महिला ठरली होती. २०१३ मध्ये नासाने ८ अंतराळवीरांमध्ये चार महिला असल्याची घोषणा केली होती.

हिलरी क्लिंटन यांनी वयाच्या १४ व्या वर्षी म्हणजे १९६१ साली नासाला पत्र लिहून चंद्रमोहिमेत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याला नासाने नकार दिल्यानंतर हिलरी पुस्तके, भाषणे यातून नेहमीच महिला अंतराळवीर चंद्रावर पाठविल्या जाव्यात याचा पुरस्कार करत असत.

Leave a Comment