फेसबुकवर युवकांचे पलायन, वयस्करांच्या उड्या


तरुणांमध्ये एकेकाळी क्रेझ असलेली सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक वरून युवक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असून वयस्करांची संख्या मात्र वाढत आहे असे एका ताज्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

ई मार्केटर नावाच्या संस्थेने हे सर्वेक्षण ब्रिटनमध्ये केले आहे. संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार वर्ष 2018 मध्ये किशोरवयीन मुले-मुली आणि युवक फेसबुकचे आपले खाते बंद करणार आहेत. त्याचवेळेस वयस्कर व्यक्तींची संख्या मात्र वाढणार आहे.

“वर्ष 2018 मध्ये 12 ते 17 वर्षाचे 22 लाख 824 वर्षाचे 45 लाख लोक नियमितपणे फेसबुकचा वापर करतील. वर्ष 2012 च्या तुलनेत ही संख्या सात लाखांनी कमी असेल,” असे हा अहवाल सांगतो.

त्याचवेळेस 55 वर्षांवरील व्यक्तींचा गट हा फेसबुकवरील दुसरा सर्वात मोठा गट असेल असाही अंदाज या अहवालात वर्तविला आहे. या वयोगटातील 64 लाख लोक नियमितपणे फेसबुकवर सक्रिय असतील असे असले तरी 25 ते 30 वर्षे वयोगटातील लोकसंख्या सर्वात जास्त आहे.

“फेसबुकच्या तुलनेत युवकांमध्ये स्नॅपचॅट व इन्स्टाग्राम यांसारख्या सेवांची लोकप्रियता वाढत आहे. आकडेवारीतून ही गोष्ट स्पष्ट होत आहे,” असे ई मार्केटर संस्थेचे तज्ञ बिल फिशर यांनी सांगितले.

Leave a Comment