इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजे काय?


जर एखद्या व्यक्तीला सलग तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ पोटदुखी, गॅसेस, पोट फुगणे, अनियमित मलत्याग या समस्यांना तोंड द्यावे लागत असेल, त्या व्यक्तीला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम ( आयबीएस ) असण्याची शक्यता आहे. एका रिसर्च नुसार जर एखाद्या व्यक्तीला आयबीएस असेल, तर त्या व्यक्तीने नियमितपणे ड जीवनसत्वाचे सेवन केल्यास हा विकार दूर होण्यास मदत मिळू शकते. आयबीएस हा विकार पोट आणि आतड्यांशी संबंधित असून, यामध्ये रुग्णाच्या पोटामध्ये सूज येते आणि पोटामध्ये वेदना होत राहतात. याशिवाय रुग्णाला इतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

आयबीएसशी निगडीत सर्वात मोठी समस्या म्हणजे अनियमित मलत्याग. शौचाची अनियमितता हा एक विकार नसून अनेक विकारांचे हे लक्षण असू शकते. यामध्ये मोठे आतडे आणि छोट्या आतड्यांमध्ये अवरोध निर्माण होतो. आयबीएसचे प्रमाण वयस्क लोकांमध्ये आढळून येते. साधारण दहा ते बारा टक्के वयस्क व्यक्ती या विकाराने ग्रस्त झालेल्या पाहायला मिळतात. या रुग्णांच्या अवलोकनानंतर त्यांच्या शरीरामध्ये ड जीवनसत्वाची कमतरता आढळून आली. या रुग्णांना ड जीवनसत्व युक्त सप्लीमेंट दिल्यानंतर काही काळाने यांच्या पोटामधील सूज, मलावरोध आणि इतर तक्रारींचे प्रमाण कमी होताना आढळले.

इंग्लंडमधील शेफिल्ड विद्यापीठातील प्राध्यापक बर्नार्ड कॉर्फे यांनी या निदानाची पुष्टी केली आहे. त्यांच्या मतानुसार आयबीएस ने त्रस्त असलेल्या सर्व व्यक्तींनी आपल्याला पुरेसे ड जीवनसत्व मिळत आहे अथवा नाही याचे परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. ज्यांच्या शरीरामध्ये ड जीवनसत्वाची कमतरता असेल, त्यांनी ती कमतरता दूर करण्याकरिता सप्लीमेंट घेणे आवश्यक आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसल्याने ही शरीराला ड जीवनसत्व मिळते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment