कानाच्या जवळील पॉइंट दाबून ‘मेंटेन’ करा आपली फिगर


आजच्या यंत्रयुगामध्ये मनुष्याला शारीरिक श्रम करण्याची फारशी आवश्यकता पडत नाही. याच जीवनशैलीचा परिणाम म्हणून संपूर्ण जगभरामध्ये लठ्ठपणा सारख्या विकाराचे प्रमाण वाढीला लागल्याचे दिसून येत आहे. ह्या विकाराबद्दल लोक जास्त जागरूक होताना दिसू लागले आहेत. त्याबरोबरच योग्य व्यायाम आणि आहार याबद्दल लोक जास्त आग्रही होताना दिसत आहेत. वैद्यकीय उपचारांनी देखील लठ्ठपणा कमी करता येणे आता शक्य होऊ लागले आहे. पण तरीही वजन घटविणे आणि उत्तम फिगर मेंटेन करणे हे सोपे काम नाही. व्यायाम आणि आहाराच्या बाबतीत काटेकोर नियम पाळून लोक सडपातळ होतातही, पण हा सडपातळ बांधा मेंटेन करणे ही खरी जोखीम असते. त्याचसाठी एक उपाय अक्यूप्रेशरच्या शास्त्रामध्ये सांगितला गेला आहे.

आजकाल अनेक व्याधींच्या उपचारासाठी अक्यूप्रेशरचा वापर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वजन कमी करणे आणि ते कायम तसेच राखणे यासाठी अक्युप्रेशरचा वापर करता येऊ शकेल. यासाठीचा बिंदू आपल्या कानाच्या मागे आहे. ह्या बिंदूवर दाब दिल्याने भुकेवर नियंत्रण मिळविता येते. तसेच या बिंदूवर दाब दिल्याने पचनशक्ती सुधारते. दररोज केवळ काही सेकंद या बिंदूवर दाब दिल्याने इच्छित परिणाम दिसून येऊ शकतात.

कानामागील बिंदूवर दाब देण्याकरिता आपल्या हाताची तर्जनी कानाच्या बरोबर खाली, जिथे जबड्याची हालचाल सर्वात जास्त जाणविते त्या बिंदूवर ठेऊन, तिथे काही सेकंद दाब द्यावा. हा बिंदू तुमचा कान आणि तुमचा जबडा याच्या मधील ‘अॅक्टीव्ह पॉइंट’ असेल. ह्या बिंदूवर तुम्हाला काही सेकंदांकरिता दाब द्यायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. ती म्हणजे ही काही जादुई करामत नाही. यामुळे या उपायाव्यतिरिक्त आहारावर नियंत्रण आणि व्यायाम यांची जोड मिळाली तर आपले वजन घटण्यास अधिक मदत मिळेल, व त्याच बरोबर वजन मेंटेन करणे देखील शक्य होईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment