इस्त्रो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवणार रोव्हर


नवी दिल्ली – प्रथमच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर (वाहन) उतरवण्याचा प्रयत्न चांद्रयान २ मिशनच्या अंतर्गत भारतीय अवकाश संशोधन केंद्र (इस्त्रो) करणार असून ही मोहीम एप्रिलमध्ये लाँच होईल अशी माहिती अवकाश खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.

हे रोव्हर दक्षिण ध्रुवाजवळच्या जमिनीवर उतरवण्यात येईल. जवळपास ८०० कोटी रुपये रोव्हर बनवण्यासाठी खर्च येणार असल्याची माहिती इस्त्रोचे नवनिर्वाचित अध्यक्ष के. सिवन यांनी दिली. चांद्रयान २ हे चांद्रयान १ च्या मोहिमेचा पुढचा टप्पा आहे. इस्त्रोला चांद्रयान १ मध्ये चंद्रावर पाणी असल्याच्या खुणा सापडल्या होत्या. अवकाशातील कुठल्याही भागावर रोव्हर उतरवणे ही इस्रोची पहिली आंतर-ग्रहीक मोहीम आहे. एप्रिलमधील ठरलेल्या तारखेला रोव्हर लँड करणे शक्य झाले नाही तर नोव्हेंबरमध्ये पुन्हा प्रयत्न केला जाईल. याआधीच्या चंद्र मोहिमा चंद्राच्या विषुववृत्त परिसरात झाल्या आहेत. त्यामुळे दक्षिण ध्रुवावर रोव्हर (वाहन) उतरवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सिवन यांनी सांगितले.

Leave a Comment