घड्याळाच्या सेलएवढा फोन टायनी टी वन


किकस्टार्टर कंपनी झँकॉ ने जगातील सर्वात छोट्या आकाराचा फोन बनविल्याचा दावा खरा केला असून त्याचा नवा टायनी टी वन हा फिचरफोन घड्याळ अथवा रिमोट मध्ये वापरल्या जाणारया सेलएवढ्या आकाराचा आहे. दोन महिन्यात हा फोन बाजारात येत असून त्याचे वजन अवघे १३ ग्राम आहे. या फोन मध्ये स्मार्टफोन प्रमाणे काही फिचर आहेत.

या फोनसाठी मिडियाटेक कंपनी एमटीके ६२६१ डी मदरबोर्ड दिला गेला असून फोनला ३२ एमबी रॅम आहे. ०.४९ इंची ओलेड स्क्रीन, २०० एमएएच बॅटरी, आहे आणि हा फोन टू जीला सपोर्ट करतो. यात व्हॉइस चेंजिंग फिचर आहे यामुळे लहान मुले, मुलगा, मुलगी आशय कुणाच्याही आवाजात युजर बोलू शकतो. हा ब्ल्यू टूथ कनेक्ट असून या फोनचा वापर रिमोट म्हणूनही करता येणार आहे.

या फोनमध्ये ५०० कॉन्टॅक्ट ब्ल्यू टूथच्या सहाय्याने ट्रान्फ्तर करता येणार आहेत तसेच ५० एसएमएस सेव्ह करता येणार आहेत. फोनला माईक लाउडस्पीकर हि दिला गेला आहे. भारतात हा फोन साधारण २५०० रुपयात मिळू शकेल असे समजते.

Leave a Comment