उत्तराखंड मधील सिद्धबली धाम


उत्तराखंड अनेक पवित्र हिंदू धर्मक्षेत्रांची भूमी आहे. याच राज्यात खोह नदीकाठी हनुमानाला समर्पित असलेले सिद्धबली धाम हे असेच जागृत क्षेत्र असून येथे भाविकांची नेहमीच गर्दी असेत. पौडी क्षेत्रापासून अडीच किलोमीटरवर असलेल्या कोटेश्वर येथे छोट्या पहाडावर हे मंदिर आहे. ज्या भाविकांनी बोललेले नवस पूर्ण होतात ते येथे भंडारा करतात आणि नवल म्हणजे येथे भंडारा करण्यासाठी २०२५ पर्यंतचे बुकिंग फुल झाले आहे. २००८ साली या मंदिराच्या नावाने टपाल खात्याने एक तिकीट जारी केले होते.


या मंदिरात हनुमानाला प्रसाद म्हणून गुळ, बत्तासे व नारळ यांचा नैवेद्य दाखविला जातो.या मंदिरची आख्यायिका अशी सांगितली जाते की कलियुगात शिवाचा अवतार म्हणून गोराख्नाथानी जन्म घेतला. त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ बजरंगाच्या अज्ञेने त्रियाची राणी मैनावती सह गृहस्थाश्रम भोगत होते तेव्हा गुरूला त्यातून मुक्त करण्यासाठी गोरखनाथ चालले. वाटेत त्याच्याशी रूप बदललेल्या हनुमानाने युद्ध केले. मात्र दोघांपैकी कुणीच हरेना तेव्हा हनुमान प्रसन्न झाले आणि गोरखनाथांना वर मागायला सांगितले. गोरखनाथानी तुम्ही येथे वास्तव्य करावे अशी प्रार्थना केली. तेव्हापासून हे ठिकाण सिद्धबली धाम म्हणून प्रसिद्धीस आले.

असेही सांगतात की ब्रिटीश काळात एका मुस्लीम अधिकाऱ्याने त्याला पडलेल्या स्वप्नाप्रमाणे सिद्धबली समाधीजवळ छोटे मंदिर बांधले. त्यानंतर भाविकांच्या मदतीतून येथे मोठे मंदिर बांधले गेले.

Leave a Comment