अमेझॉनशी स्पर्धेसाठी फ्लिपकार्ट, वॉलमार्ट हातमिळवणी?


भारतीय बाजारात चांगलेच हातपाय पसरलेल्या अमेझॉन या ईकॉमर्स व्यवसायाशी स्पर्धा करण्यासाठी ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट व अमेरिकन रिटेलर वॉलमार्ट हातमिळवणीच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. वॉलमार्ट फ्लिपकार्ट मधील ४० टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहे व त्या संदर्भात दोन्ही कंपन्यात बोलणी सुरु आहेत. शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार ही बोलणी यशस्वी झाली तर अमेरिकन रिटेलर वॉलमार्टचे हे सर्वात मोठे विदेशी डील ठरणार आहे.

फ्लिपकार्टचे सध्याचे बाजारमूल्य १२ अब्ज डॉलर्स असून कंपनीने त्याचा पाचवा हिस्सा गतवर्षी जपानी कंपनी सॉफ्ट बँकेला अडीच अब्ज डॉलर्सला विकला आहे. अमेझॉन भारतात विस्तारासाठी ५ अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या तयारीत आहे. या अमेझॉन किराणा माल डीलीव्हरीही देणार आहे. त्यामुळे फ्लिपकार्टला स्पर्धेसाठी वॉलमार्टची मदत उपयुक्त ठरेल तसेच या निमित्ताने वॉलमार्टला ई कॉमर्स कंपनीत त्यांची स्थिती मजबूत करणे शक्य होणार आहे. वॉलमार्टने गेल्या महिन्यात जेट डॉट कॉम कंपनीत ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

Leave a Comment