घोटाळ्यात अडकलेल्या पंजाब बँकेचा वैभवशाली इतिहास


स्थापनेची १२४ वर्षे पूर्ण केलेली मात्र आता ११३५६ कोटींच्या घोटाळ्यात अडकलेली पंजाब नॅशनल बँक वैभवशाली इतिहास असलेली बँक आहे याची माहिती अनेकांना नसेल. भारत पाक फाळणी झाली नव्हती तेव्हा लाहोर मध्ये ही बँक स्थापन केले गेली आणि तिच्या पहिल्या संचालक मंडळात भारताचे स्वातंत्रवीर लाला लजपत राय याच्यासह अनेक नामवंत होते. १९ मी १९९४ साली लाहोरच्या अनारकली बाजारात या बँकेचे मुख्यालय नोंदणी केले गेले आणि २३ मे रोजी संचालक मंडळाची पहिली बैठक पार पडली. त्यानंतर वैशाखीपूर्वी एक दिवस म्हणजे १२ एप्रिल १८९५ ला बँक सुरु झाली होती.

बँकेच्या संचालक मंडळात दयालसिंग मार्जीनिया (ट्रिब्युनचे संस्थापक), लाला हरकिशन लाल( उद्योगपती), कालीप्रसन्न रॉय (वकील), ईसी जेस्सावाला (पारसी उद्योगपती), प्रभू दयाळ (मुल्तानातील श्रीमंत), जयाशिराम बक्षी (वकील), लाला डोलानदास (बँकर) आणि लाला लजपतराय यांचा समावेश होता. हे सर्वजण स्वदेशी चळवळीशी संबंधित होते.


संपूर्ण भारतीय गुंतवणुकीवर सुरु झालेली ही पहिलीच बँक होती. जुलै १९६९ मध्ये अन्य १३ बँकांबरोबरच तिचेही राष्ट्रीयीकरण केले गेले. आज देशातील ही दोन नंबरची मोठी बँक आहे. या बँकेची लाहोर बाहेरची पहिली शाखा कराची मध्ये १९०० साली सुरु झाली. १९४७ साली फाळणीनंतर लाहोर कार्यालय बंद झाले मात्र लाहोर हायकोर्टाने दिल्ली येहते नोंदणी करून कार्यालय सुरु करण्याची अनुमती दिली. या बँकेच्या खातेदरात महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू, जालियानवाला बाग संस्था, अश्या मान्यवारांचा समावेश आहे.

या बँकेच्या देशात ७६४ शाजारात ६९७१ शाखा आहेत तसेच ब्रिटन, हाँगकॉंग, काबुल, अलमाटी, शांघाय, दुबई येथे शाखा व प्रतिनिधी कार्यालये आहेत. बँकेत ७० हजाराहून अधिक कर्मचारी आहेत आणि ४.५ लाख कोटीचे कर्जवाटप केले गेले आहे. बँक खातेदाराची संख्या १० कोटींवर असून देशात १०,७०० एटीएम लावली गेली आहेत. बँकेने उत्कृष्ठ कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळविले आहेत.

Leave a Comment