मोटो झेड २ फोर्स भारतात लाँच


लेनोवोने दिल्लीत गुरुवारी त्याच्या अधिग्रहित कंपनी मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन मोटो झेड टू फोर्स लाँच केला असून या फोनची किंमत आहे ३४९९९ रुपये. मागच्या फोर्सप्रमाणेच या फोन मध्येही शॅटरशील्ड तंत्रज्ञान वापरून शॅटरप्रुफ डिस्प्ले दिला गेला आहे. भारतात या फोनची लिमिटेड एडिशन उपलब्ध केली गेली आहे. हा फोन फ्लिपकार्ट आणि मोटो हब मध्ये मिळू शकेल. हे मॉडेल बॅटरीपॅक सह आहे. फोनसह येणाऱ्या टर्बोपॉवर पॅक मॉडेलची किंमत ५९९९ रुपये आहे.

या फोनला ड्युअल सीम, ५.५ इंची शॅटरशील्ड डिस्प्ले, ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज, ते मायक्रोकार्डच्या सहाय्याने २ टीबी पर्यटन वाढविण्याची सुविधा, १२ एमपीची सोनी कॅमेरे, फिंगरप्रिंट सेन्सर सह होम बटण दिले गेले आहे. हा फोन पाणी, धूळ प्रतिबंधक असून स्क्रीन ब्रेकेज साठी ४ वर्षाची गॅरंटी आहे. स्नॅपड्रॅगन प्रोसेसर ८३५ व ग्राफिकसाठी ५४० जीपीयु आहे.

Leave a Comment