ओठांच्या आजूबाजूला काळसर डाग असल्यास ..


अनेक व्यक्तींच्या ओठांच्या आसपास काळसर डाग दिसून येतात. त्यामुळे बाकी चेहऱ्याच्या मानाने त्यांचे ओठ खूपच काळसर दिसतात. त्यामुळे चेहरा देखील अनाकर्षक दिसू लागतो. क्वचित प्रसंगी ओठांच्या किनाऱ्यावर काळसर रेष दिसू लागते. ओठांच्या किनाऱ्यावर किंवा ओठांवर जर काळसर डाग दिसू लागले, तर शरीरामध्ये जीवनसत्वांची कमी असू शकते हे ओळखावे. एखाद्या सौंदर्यप्रसाधनाची अॅलर्जी आल्याने देखील ओठांवर काळसर डाग दिसून येऊ शकतात. हा काळसरपणा दूर करण्यसाठी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

काही व्यक्तींना सतत ओठांवरून जीभ फिरविण्याची सवय असते. यामुळे ओठांच्या त्वचेवर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अश्या प्रकारचे इन्फेक्शन झाल्यास ओठांवर काळसर डाग पडू शकतात. अश्या वेळी ओठांवर वारंवार जीभ फिरविण्याची सवय कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा. ओठांना आणि ओठांच्या आसपासच्या त्वचेला एखाद्या चांगल्या प्रकारच्या सौम्य एक्सफोलीयेटर स्क्रब चा वापर करून स्क्रब करावे.

ओठांच्या आसपासची त्वचा आणि ओठ वारंवार कोरडे पडत असतील तर त्यांवर काळसर डाग येण्याचा संभव असतो. हे टाळण्यासाठी ओठांच्या आसपासच्या त्वचेला व ओठांना वारंवार मॉईश्चराइज करीत राहावे. तसेच बाजारामध्ये अनेक उत्तम ब्रँडची स्कीन लाईटनिंग क्रीम्स उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे योग्य लाईटनिंग क्रीम निवडावे. या क्रीमच्या वापरामुळे ओठांच्या आसपासचे डाग कमी होण्यास मदत होईल.

उन्हामुळे देखील ओठांच्या आसपास काळसर डाग उत्पन्न होतात. त्यामुळे दररोज उत्तम प्रतीच्या सनस्क्रीनचा वापर करावा. शरीरामध्ये जीवनसत्वे कमी असल्यास ही अश्या प्रकारचे काळसर डाग पडू शकतात. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असलेले अन्नपदार्थ समाविष्ट करावेत. जर आवश्यकता जाणविली तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लीमेंट्स ही घ्याव्यात. जर काळसर डाग खूप मोठ्या प्रमाणावर असतील तर केमिकल पील्सचा वापर करता येईल, मात्र ही प्रक्रिया तज्ञांकडूनच करवून घ्यावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment