बीएसएनएल ९९९ रुपयात देणार एक वर्षांसाठी इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा


मुंबई – एक धमाकेदार ऑफर बीएसएनएलने आणली असून ९९९ रुपयांत एक वर्षांसाठी दिवसाला १ जीबी डाटा युजर्सना देत आहे. याशिवाय सहा महिन्यांसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही या प्लानमध्ये देण्यात येत आहे. युजरला रिचार्ज केल्यानंतर १८१ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस करण्याची सुविधा मिळणार आहे. यानंतर मात्र कॉलिंग आणि एसएमएससाठी चार्ज लागेल. इंटरनेटची सुविधा मात्र एक वर्षांसाठी असणार आहे.

बीएसएनएलने आपल्या युजर्ससाठी काही दिवसांपुर्वी कुल ऑफर आणली होती. कंपनीच्या प्रीपेड युजर्ससाठी ही ऑफर होती. बीएसएनएलच्या या प्लानची खास गोष्ट म्हणजे त्यात डाटाची काही लिमिट नाही. अनलिमिटेड डाटा या प्लानमध्ये मिळत आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगची सुविधादेखील मिळत आहे. तसेच 100 एसएमएस देखील मिळणार आहेत. हा प्लान १०९९ चा असणार आहे. बीएसएनएलच्या सर्व प्लानमध्ये ३जी डाटा मिळत आहे. हा प्लान ८४ दिवसांसाठी वैध आहे.

Leave a Comment