सौदीतील भारतीय कामगारांवर बेरोजगारीचे संकट


सौदी सरकारने नुकतेच १२ विविध सेक्टर मध्ये परदेशी कामगाराच्या काम करण्यावर बंदी आणली असून याचा मोठा फटका भारतीय कामगारांना बसणार आहे. पुढच्या हिजरी वर्षापासून ही बंदी लागू होणार असल्याचे कामगार मंत्री आली गल गफीस यांनी जाहीर केले. स्थानिकांना अधिक प्रमाणार रोजगार मिळावा म्हणून हा निर्णय घेतला गेल्याचे समजते.

यानुसार घड्याळ दुकाने, चष्म्याची दुकाने, वैद्यकीय उपकरणे स्टोर, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रोनिक शॉप्स, कार सुटे भाग विक्री दुकाने, बिल्डींग समान दुकाने, कार्पेट शॉप्स, ऑटोमोबाईल व मोबाईल शॉप्स, होम फर्निचर, रेडीमेड ऑफिस मटेरियल, रेडीमेड कपडे, भांडी दुकाने, केक पेस्ट्री बेकरी यांचा यात समावेश आहे. दुबईत सध्या १ कोटी परदेशी कामगार आहेत यामुळे तेथील बेरोजगारी वाढून १२.१ टक्क्यांवर गेल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment