दुबईत स्मार्ट पाम झाडे करतील दुनियेशी कनेक्ट


दुबईत सध्या सोलर ऊर्जेबाबत मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविले जात असून त्यात स्मार्ट पाम झाडे महत्वाची भूमिका बजावणार आहेत. समुद्र किनारी सध्या अशी ५० झाडे उभी केली गेली असून हे झाडे पर्यटक तसेच स्थानिकांना सावली देणार नाहीत पण फ्री वायफायच्या सहाय्याने जगाशी कनेक्ट करतील. ही स्मार्ट पाम सस्टेनेबल एनर्जी स्टेशन प्रमाणे काम करत असून स्मार्ट पाम कंपनीने अशी झाडे उभारण्यासाठी १०३ जागा निश्चित केल्या आहेत. त्यातील ५० जागांवर ही झाडे कार्यरत झाली आहेत.


या झाडांची उंची २० फुट असून त्यांना १८ चौरस मीटरची पाने जोडली गेली आहेत. झाडांच्या पानावर सोलर पॅनल बसविली गेली आहेत. त्यावर ३६० डिग्री इन्फ्रारेड सीसीटीव्ही कॅमेरे असून युजर साठी इमरजन्सी बटण आहे. प्रत्येक झाडावर चार्जिंग पॉइंट आहे. कोणत्याही दिशेने १०० मीटर दूर वायफाय रेंज मिळते. दिवसा ही पाने चार्ज होतात व रात्री एनर्जीचा वापर करता येतो. दिवसरात्र ही झाडे फुलचार्ज असतात.

झाडावर स्क्रीन लावले गेले आहेत त्यावर दुबई बद्दलची सर्व माहिती मिळू शकते असेही समजते.

Leave a Comment