गारेगारच पण तिखटजाळ आईसक्रीम


आईसक्रीमचे नुसते नाव काढले तरी गारेगार, गोड आणि अनेक स्वादाची चव जिभेवर येते. थंडी असो, पाऊस असो वा उन्हाळा आईसक्रिमसाठी खवय्ये नेहमीच तयार असतात. आता विविध स्वादाची शोकाडो आईसक्रिम उपलब्ध आहेत. मात्र कडाक्याच्या थंडीतही शरीरातील हाडे गरम करणारे आईसक्रिम खायचे असेल तर स्कॉटलंडमधील अल्द्वीच कॅफे रेस्पाएरो डेल डीयावोलो येथे गेले पाहिजे.

येथे मिळणारे ब्रेद ऑफ द डेव्हिल नावाचे आईसक्रिम नेहमीच्या आईसक्रिम प्रमाणेच गारेगार आहे मात्र गोडाऐवजी ते तिखटजाळ आहे. हे आईसक्रिम लाल मिर्चीच्या चटणीपेक्षा ५०० पट अधिक तिखट आहे. त्यामुळे हे आईसक्रिम खाण्यासाठी अनेक अटी घातल्या गेल्या आहेत. त्यातील मुख्य म्हणजे १८ वर्षाखालील व्यक्ती हे आईसक्रिम विकत घेऊ शकत नाही.


सिगारेटच्या पाकिटावर ज्याप्रमाणे सावधानतेचा इशारा दिलेला असतो तसाच या आईसक्रिम साठीही दिला जातो. हे आईसक्रिम खाणारयाचे नुकसान होऊ शकते, जीवही जाऊ शकतो असा खुलासा यावर केला गेला आहे. तरीही आईसक्रिम खरेदी करायचे असेल तर कायदेशीर कागदपत्रावर सह्या कराव्या लागतात. या आईसक्रिमचा तिखटपणा इतका जहाल आहे कि विक्रेते ते देताना हँडग्लोव्ह घालूनच सर्व्ह करतात. या आईस्क्रीमच्या बाउलसाठी २ पौंड. तर कोन साठी १.९० पौंड मोजावे लागतात.

रेस्टोरंट मालकाने दिलेल्या माहितीनुसार या आईस्क्रीमची रेसिपी मुळची इटलीयन आहे.१९३६ साली ती तयार केली गेली व यात घरातलेच पदार्थ वापरले जातात. इटलीत डेव्हिल्स ब्रिज नावाच्या ठिकाणी हे आईस्क्रीम विकले जात असे. हे ठिकाण म्हणजे कुटुंबाच्या, नातेवाईकांच्या गाठीभेटी घेण्याचे ठिकाण. त्यात आपल्याला वर्ष कसे गेले यावर मुख्य चर्चा होत असे. एखाद्याला त्याची बहादुरी दाखवायची असेल तर त्याला हे आईस्क्रीम खावे लागते. स्कॉटलंड मध्ये हे आईस्क्रीम प्रथमच उपलब्ध झाले आहे. या आईस्क्रीमची रेसिपी गुप्त असून ती रेस्टोरंट मालकाच्या मुलानाही माहिती नाही असे समजते.

Leave a Comment