फेसबुक देणार डाऊनव्होट बटण


सोशल साईट फेसबुकने लवकरच युजरना न आवडलेल्या पोस्टवर मत व्यक्त करण्यासाठी एक बटण दिले जाणार असल्याचे कन्फर्मेशन दिले असल्याचे टेक वेबसाईट कंपनीतर्फे सांगितले गेले आहे. फेसबुक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिल्या गेलेल्या या बातमीनुसार या बटणाच्या चाचण्या अमरिकेत काही निवडक युजर बरोबर सुरु आहेत. अर्थात त्यासाठी फेसबुक डीसलाईक बटण देणार नाही तर डाऊनव्होट बटण देणार असल्यचे सांगितले जात आहे.

सध्या सुरु असलेल्या चाचण्यानुसार युजर ज्या पोस्टला किंवा कॉमेंटला डाऊनव्होट करतोय ती चुकीची, गैरसमज पसरविणारी अथवा भ्रम निर्माण करनारी आहे काय याची खात्री करून घेतली जात आहे. फेसबुकवर आवडलेल्या पोस्ट साठी लाईक करण्याची सुविधा आहे मात्र नापसंती व्यक्त करण्यासाठी डीसलाईक बटानची प्रतीक्षा युजर करत होते.

फेसबुक देणार असलेले डाऊनव्होट बटण युजरने क्लिक केले कि त्याला ऑफेन्सिव्ह, मिसलीडिंग व ऑफ टॉपिक असे ऑप्शन मिळणार आहेत. त्यातील एक युजरने निवडायचा आहे.

Leave a Comment