जिओच्या फिचरमध्ये देखील आता वापरू शकता फेसबुक


नवी दिल्‍ली : रिलायन्स जिओने व्हॅलेंटाईनच्या दिवशी आपल्या ग्राहकांना एक खास गिफ्ट दिले असून जिओ फिचर फोन घेतलेल्या ग्राहकांना या गिफ्टमुळे चांगलाच फायदा होणार आहे.

आता आपल्या ४जी फीचर फोनमध्ये जिओ फोनचे ग्राहक सोशल मीडिया अ‍ॅप फेसबुकचा वापर करू शकतील. रिलायन्स जिओने माहिती दिली की, बुधवार म्हणजेच व्हॅलेंटाईन डे पासून त्यांचे ग्राहक जिओ अ‍ॅपस्टोरवरून फेसबुक अ‍ॅप डाऊनलोड करू शकतील. जिओच्या ओएससाठी फेसबुकचे हे खास व्हर्जन तयार करण्यात आले आहे. यात पुश-नोटिफिकेशन, व्हिडिओ आणि एक्टर्नल कंटेट लिंक असे काही फीचर्स असतील.

जिओकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, जिओ फोनचे ग्राहक यामुळे आता फेसबुक वापरू शकतील. जिओचे मुख्य आकाश अंबानी म्हणाले की, फेसबुक तर केवळ सुरूवात आहे. जिओफोन जगातील चांगले मोबाईल अ‍ॅप एकाच जागी आणतील. हे जिओ फोन ग्राहकांना माझे आश्वासन आहे.

Leave a Comment