प्रेमाचे प्रतिक साकारून गुगलने दिल्या ‘व्हेलेंटाइन्स डे’च्या शुभेच्छा


मुंबई – आज प्रेमाचा दिवस असून सगळेच जण आजचा दिवस साजरा करण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. तरुणाई आजच्या दिवशी आपले प्रेम व्यक्त करत असते. या प्रेमाच्या उत्सवात गुगलही मागे राहिलेले नाही. डूडलच्या माध्यमातून गुगलने प्रेमाच्या या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

गुगलने व्हॅलेंटाईन डे आणि विंटर ऑलंपिकच्या पार्श्वभूमीवर आजचे डूडल तयार केले आहे. बाहेरची गुलाबी थंडी आणि त्यात प्रेमाचा वर्षाव…तसेच गुगलनेही केलं आहे. गुगलने एक छान म्यूझिक आणि त्यात दोन पक्षांचा एकत्रित डान्स असा एक व्हिडिओ तयार करून सर्वांना व्हेलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment