मुंबई : अॅपलने आयफोन चाहत्यांसाठी एक खास ऑफर आणली असून अॅपलच्या सर्व आयफोनवर फ्लिपकार्टने बंपर डिस्काउंट दिले आहे. आयफोन x पासून ते आयफोन SE पर्यंत सर्व स्मार्टफोनवर या सेलमध्ये मोठी सूट देण्यात आली आहे. डिस्काउंटसोबतच आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड यूजर्सला अतिरिक्त सूट मिळणार आहे. तसेच ईएमआय आणि कॅशबॅक ऑफरही देण्यात आली आहे. १२ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत हा सेल असणार आहे.
फ्लिपकार्टच्या खास सेलमध्ये आयफोनवर भरघोस सवलत
आयफोन ७ (३२जीबी) वर तब्बल ७००० रुपयांची सूट देण्यात आली असून यूजर्सला यासोबतच १८००० रुपयांची एक्सचेंज ऑफरही मिळणार आहे. हा आयफोन अॅपलने २०१६ साली लाँच केला होता. हा स्मार्टफोन आता ४२९९९ रुपयात खरेदी करता येणार आहे. तसेच आयफोन ७ प्लस (३२जीबी) हा स्मार्टफोन ५६९९९ रुपयात खरेदी करता येणार आहे. यावर ३००० रुपयांची सूट देण्यात आली आहे.
आयफोन ८ (६४जीबी) वर तब्बल ८००० रुपयांची सूट देण्यात आल्यामुळे हा फोन या सेलमध्ये ५५९९९ रुपयात खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनची बाजारात किंमत ६२००० रुपये आहे. आयफोन ८ प्लस (६४जीबी)वर ६००० रुपयांची सूट देण्यात आली असून हा स्मार्टफोन ६६९९९ रुपयात खरेदी करता येणार आहे.
आयफोन एक्स (६४जीबी) हा स्मार्टफोन ८९००० रुपयात लाँच करण्यात आला होता. हा स्मार्टफोन या सेलमध्ये ८२००० रुपयात खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनवर तब्बल ७ हजारांची सूट देण्यात आली आहे. आयफोन ६एस (३२जीबी) या स्मार्टफोनवर ६००० रुपयांची सूट देण्यात आली असून ४०००० रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन ३४००० रुपयात खरेदी करता येईल.
या सेलमध्ये आयफोन ६ (३२जीबी) हा स्मार्टफोन ग्राहकांना २५९९९ रुपयात खरेदी करता येईल. आयफोन एसई (३२जीबी) या स्मार्टफोनवर ५००० रुपयांची सूट देण्यात आली आहे. २०९९९ रुपयात हा स्मार्टफोन या सेलमध्ये खरेदी करता येईल.