शेताची राखण करत आहे सनी लिओन


शेतकरी आपल्या पिकाचे पक्षांपासून रक्षण व्हावे यासाठी आपल्या शेतात बुजगावणे उभारतो हे पाहिले आणि ऐकले देखील आहे. पण, पिकाचे रक्षण करण्यासाठी कधी कोणा शेतकऱ्यांने शेतात चक्क सनी लिओनचा बिकीनीवाला फोटो लावल्याचे तुमच्या कधी एकण्यात आले आहे? याची कल्पना केली तरी तुम्ही पोट धरून हसाल. पण ए. चेंचू रेड्डी या शेतकऱ्याने आंध्र प्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यातील बांदाकिंदिपल्ली गावातील आपल्या शेतात चक्क बिकीनीतल्या सनीचे फोटो लावले आहे.

सध्या सोशल मीडियावर त्याच्या या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे. यामागील रेड्डी यांची संकल्पना ऐकली तर तुम्ही डोक्यावर हात लावल्या शिवाय राहणार नाही. आपल्या पिकाचे रक्षण बिकीनीतली सनी करते असे त्याचे म्हणणे आहे. रेड्डी यांचे शेत रस्त्यालगत असल्यामुळे त्यांच्या पिकांकडे येणारे जाणारे पाहतात. यामुळे लोकांची नजर पिकांना लागते आणि शेतीचे नुकसान होते असे ते म्हणणात म्हणून यावर उपाय त्यांनी सनीचा मादक फोटो शेतात लावला आहे. लोकांचे या फोटोकडे पाहून लक्ष विचलित होते. फळांनी बहरलेल्या शेताकडे न पाहता ते सनीचे फोटो पाहतात त्यामुळे आपल्या शेताचे त्यांच्या वाईट नजरेपासून बचाव होते.

Leave a Comment