अॅलो व्हेराचे शरीरावर होणारे काही दुष्परिणाम


सकाळी उठल्यानंतर अॅलो व्हेराचा रस प्राशन करणाऱ्या अनेक व्यक्ती आपण पाहतो. अॅलो व्हेराचे सेवन शरीराला फायदेशीर असले तरी यामुळे क्वचित शरीरावर दुष्परिणाम देखील दिसू येऊ शकतात. विशेषतः अॅलो व्हेराचे सेवन नव्याने करणाऱ्या व्यक्तींना याचे दुष्परिणाम जाणविण्याची शक्यता असते.

अॅलो व्हेरा जेलचा वापर त्वचेला आर्द्रता देण्यासाठी केल्याने क्वचित त्वचेवर पुरळ येऊ शकते, तसेच त्वचेला खाज सुटणे, त्वचेवर लाली येणे, अश्या तक्रारी उद्भवू शकतात. तसेच रिकाम्यापोटी अॅलो व्हेरा रसाचे सेवन केल्याने डीहायदड्रेशन होऊ शकते. अनेक जण सकाळी वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराच्या एकंदर आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी अॅलो व्हेराच्या रसाचे सेवन करतात. बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या अनेक पदार्थांमध्ये ही अॅलो व्हेराचा रस असतो. पण ह्याचे सेवन करताना काळजी घ्यावी. अॅलो व्हेराचा रस रेचक आहे. म्हणजेच यामध्ये लॅक्झेटिव्ह आहे. त्यामुळे ह्या रसाच्या सेवनानंतर वारंवार शौचाची भावना होण्याची शक्यता असते.

ह्या रसाच्या वारंवार सेवनाने शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण कमी झाल्याने अशक्तपणा जाणविण्याची शक्यता असते. तसेच हृदयाचे ठोके अनियमित पडणे, सतत थकवा अश्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे या रसाचे सेवन केल्याने थोडी जरी अस्वस्थता जाणविली, तर ह्या रसाचे सेवन कमी करावे. तेच जर बद्कोष्ठ किंवा अनियमित मलत्यागाची तक्रार असेल, तरी ही अॅलो व्हेराचे सेवन करताना काळजी घ्या. अॅलो व्हेराच्या रसाच्या सेवनाने इरिटेबल बोवेल सिंड्रोमची तक्रार उद्भवू शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment