जसे केले तसेच फेडावे लागणार; भाजपच्या पराभवामुळे भाजप आमदार खूश


जयपूर – राजस्थानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवावर त्यांच्याच पक्षाचे एक आमदार आनंदी असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. भाजप आमदार आपल्या कार्यकर्त्याला जसे केले तसेच फेडावे लागणार असे सांगत असल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये लक्षात येते. ज्या आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविरोधात त्या आमदाराने बंडाचा झेंडा पुकारलेला आहे. राज्याच्या नेतृत्वात भाजपच्या महामंत्र्यांनाही परिवर्तन करण्याची गरज असल्याचे पत्र त्यांनी लिहिलेले आहे. या आमदाराचे नाव ग्यानदेव आहुजा असे असून भाजपच्या एका प्रदेश स्तरावरील नेत्यानेही पोटनिवडणुकीच्या निकालानंतर वसुंधरा राजे यांच्याविरोधात केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली होती.

राजस्थानमध्ये गेल्या महिन्यात लोकसभेच्या अलवर आणि अजमेर या दोन व विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. काँग्रेसचा या तिनही जागांवर मोठ्या फरकाने विजय झाला होता. भाजपतील केंद्रीय नेतृत्वही तेव्हापासून वसुंधरा राजे यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: You have to pay as much as you did; BJP MLA says after BJP's defeat;